प्रसिद्ध अभिनेते राज कपूर यांच्या स्मरणार्थ चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी संपूर्ण कपूर कुटुंबाने उपस्थिती लावली होती. या महोत्सवातील रणबीर कपूरचा लूकही या चर्चेत आला होता. परंतु या सगळ्यात चर्चेचा विषय ठरलं ते रणबीर आणि सैफ यांच्यातील वाद. सध्या सैफ अली खान आणि रणबीर कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघांमध्ये काहीतरी वाद होताना दिसत आहे.