

KAREENA KPOOR
ESAKAL
बॉलिवूडची बेबो करीना कपूर हिने सैफ अली खानसोबत लग्न केलेलं तेव्हा चांगलीच चर्चा रंगली होती. कपूर खानदानाच्या लाडक्या लेकीने आंतरधर्मीय विवाह केलेला. त्यामुळे सगळेच चकीत झालेले. करिनाने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलंय. तिने कायमच वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करून स्वतःच्या अभिनयाची ताकद सिद्ध केली. करीना मुलाखतींमध्ये किंवा पापाराझींसोबत बोलताना बिनधास्त आणि गर्विष्ठपणे उत्तरं देताना दिसलीये. यामुळे ती घरी कशी वागत असेल असा प्रश्न नेहमीच प्रेक्षकांना पडतो. आता तिच्या नणंदेने याचं उत्तर दिलंय.