'अप्पी आमची कलेक्टर' फेम साईराज केंद्रे याचा 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, आणि तो घराघरात पोहचला. या गाण्यातील साईराजचे एक्स्प्रेशन प्रेक्षकांना प्रचंड भावले. त्याचं गाणं इतकं व्हायरल झालं की तो रातोरात स्टार बनला. त्याला झी मराठीच्या अप्पी आमची कलेक्टर मालिकेत काम करण्याची संधी सुद्धा मिळाली.