
'सैराट' या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. या चित्रपटाने सिनेसृष्टीला नवीन चेहरे दिले. यातील आर्ची आणि परशासोबतच सल्या आणि लंगड्यादेखील प्रचंड लोकप्रिय झाले. लंगड्या म्हणजेच तानजी गळगुंडे याने त्यानंतर अनेक चित्रपटात काम केलं. तो त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिला. तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लिव्ह इन मध्ये राहत असल्याचं त्याने सांगितलेलं. काही महिन्यनपूर्वीच त्याने त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल माहिती दिली होती. आता तानाजी लवकरच बाबा होणार असल्याचं समोर आलंय. त्याच्या गर्लफ्रेंडने बेबी शॉवरचे फोटो शेअर केले आहेत.