

TANAJI GALGULNDE SON
ESAKAL
'सैराट' या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. त्यातील कथा, गाणी तर जबरदस्त गाजली. मात्र सगळ्यात जास्त गाजले ते कलाकार. 'सैराट' या चित्रपटाने इंडस्ट्रीला चार नवे चेहरे मिळवून दिले ते म्हणजे आर्ची, परश्या, सल्या आणि लंगड्या. हे चौघेही आता सिनेसृष्टीत काम करत आहेत. त्यातही चित्रपटात लगद्याची भूमिका साकारणारा अभिनेता तानाजी गलगुंडे हा खऱ्या आयुष्यातही लंगडा होता. मात्र नंतर त्याने पायांवर शस्त्रक्रिया करून घेतली. त्याचं लग्न झालंय ही गोष्टही अनेकांना ठाऊक नाही. त्याला एक मुलगादेखील आहे. आता पहिल्यांदाच तानाजीच्या मुलाचा चेहरा त्याने शेअर केलाय.