Sakal Premier Awards 2024 : ‘सकाळ प्रीमियर’ पुरस्कारांची नामांकने जाहीर; १२ जून रोजी ठाण्यात रंगणार भव्यदिव्य सोहळा

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी आशीष बेंडे (आत्मपॅम्फ्लेट), केदार शिंदे (महाराष्ट्र शाहीर) आणि सुधाकर यक्कंटी (नाळ २) यांच्यात चुरस आहे.
Sakal Premier Awards 2024
Sakal Premier Awards 2024 esakal
Updated on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ‘सकाळ प्रीमियर पुरस्कारां’ची नामांकने कधी जाहीर होणार, याचीच उत्सुकता सगळ्यांना लागली होती. चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या बरोबरीने सिनेरसिकही त्याची आतुरतेने वाट पाहत होते.

त्यांची उत्सुकता संपली असून पुरस्कारांची नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपटाबरोबरच दिग्दर्शकांच्या स्पर्धेत ‘आत्मपॅम्फ्लेट’, ‘महाराष्ट्र शाहीर’ आणि ‘नाळ २’ आघाडीवर आहेत.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी आशीष बेंडे (आत्मपॅम्फ्लेट), केदार शिंदे (महाराष्ट्र शाहीर) आणि सुधाकर यक्कंटी (नाळ २) यांच्यात चुरस आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अंकुश चौधरी (महाराष्ट्र शाहीर), अजय पूरकर (सुभेदार) आणि शशांक शेंडे (बापल्योक) यांची नामांकने जाहीर झाली आहेत.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मधुरा वेलणकर (बटरफ्लाय), निर्मिती सावंत (झिम्मा २) आणि शिल्पा नवलकर (बाईपण भारी देवा) यांची नावे स्पर्धेत आहेत. बुधवार, १२ जून रोजी संध्याकाळी सहा वाजता ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात पुरस्कार सोहळा रंगणार असून पी.एन.जी. ज्वेलर्स लि. त्याचे मुख्य प्रायोजक आहेत. सत्कारमूर्तींच्या गौरव सोहळ्यात मनोरंजनाची खास मेजवानीही असणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील

तारे-तारका आणि राजकीय, सामाजिक अन् उद्योग क्षेत्रातील मान्यवर मंडळींची हजेरी सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. या सोहळ्यास सर्वांना उपस्थित राहता येणार आहे.

प्रीमियर पुरस्कार सोहळ्यात एकूण ३० चित्रपटांनी सहभाग नोंदवला होता. मराठी सिनेसृष्टीतील मान्यवर मंडळींनी परीक्षक म्हणून काम पाहिले. विशेष बाब म्हणजे, पी.एन.जी. ज्वेलर्स लि.चे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ हेदेखील परीक्षक समितीत सहभागी झाले होते.

‘सकाळ प्रीमियर’तर्फे दिला जाणारा पुरस्कार खूप मोठा आणि मानाचा आहे. या पुरस्कारासाठी परीक्षक म्हणून काम पाहणे खूप मोठी जबाबदारी होती. सर्वच चित्रपट दर्जेदार आहेत. त्यातून नामांकने काढणे हे खूपच कठीण काम होते. सर्वच कलाकारांनी उत्तम काम केले आहे. खूप विचारविनिमय करून आम्ही योग्य तो निकाल काढण्याचा प्रयत्न केला आहे,’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

अशी आहेत नामांकने

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट ः आत्मपॅम्फ्लेट (झी स्टुडिओज), महाराष्ट्र शाहीर (एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट आणि केदार शिंदे प्रॉडक्शन) आणि नाळ २ (झी स्टुडिओज आणि आटपाट निर्मिती)

  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ः आशिष बेंडे (आत्मपॅम्फ्लेट), केदार शिंदे (महाराष्ट्र शाहीर) आणि सुधाकर यक्कंटी (नाळ २)

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता ः अंकुश चौधरी (महाराष्ट्र शाहीर), अजय पूरकर (सुभेदार) आणि शशांक शेंडे (बापल्योक)

  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ः मधुरा वेलणकर (बटरफ्लाय), निर्मिती सावंत (झिम्मा २) आणि शिल्पा नवलकर (बाईपण भारी देवा)

  • सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता ः संदीप पाठक (श्यामची आई), विठ्ठल काळे (बापल्योक) आणि सिद्धार्थ चांदेकर (झिम्मा २)

  • सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री ः नम्रता संभेराव (एकदा येऊन तर बघा), केतकी सराफ (आत्मपॅम्फ्लेट), दीप्ती देवी (नाळ २)

  • सर्वोत्कृष्ट कथा ः आशिष बेंडे (आत्मपॅम्फ्लेट), विभावरी देशपांडे (बटरफ्लाय) आणि हेमंत ढोमे (झिम्मा २)

  • सर्वोत्कृष्ट पटकथा ः मकरंद माने व विठ्ठल काळे (बापल्योक), दिग्पाल लांजेकर (सुभेदार) आणि परेश मोकाशी (आत्मपॅम्फ्लेट)

  • सर्वोत्कृष्ट संवाद ः नागराज मंजुळे (नाळ २), मकरंद माने व विठ्ठल काळे (बापल्योक) आणि दिग्पाल लांजेकर (सुभेदार)

  • सर्वोत्कृष्ट गीतकार ः गुरू ठाकूर (महाराष्ट्र शाहीर), दिग्पाल लांजेकर (सुभेदार) आणि वैभव देशमुख (घर बंदूक बिर्याणी)

  • सर्वोत्कृष्ट संगीतकार ः ए. व्ही. प्रफुल्लचंद्र (घर बंदूक बिर्याणी), अजय-अतुल (महाराष्ट्र शाहीर) आणि देवदत्त मनीषा बाजी (सुभेदार)

  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक ः स्वप्नील बांदोडकर (फुलराणी - तुझ्या सोबतीचे), जयेश खरे (महाराष्ट्र शाहीर - गाऊ नको किसना) आणि अजय गोगावले (बापल्योक - उमगाया बाप रं)

  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका ः श्रेया घोषाल (महाराष्ट्र शाहीर - बहरला हा मधुमास), आनंदी जोशी (ऑटोग्राफ - ओघा ओघानी) आणि गौरी गोसावी (नाळ २ - गोडी ही दोस्तीची)

  • सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत ः अजनिश लोकनाथ (सरी), ए. व्ही. प्रफुल्लचंद्र (घर बंदूक बिर्याणी) आणि साकेत कानेटकर (आत्मपॅम्फ्लेट)

  • सर्वोत्कृष्ट संकलक ः फैजल महाडिक - इमरान महाडिक (आत्मपॅम्फ्लेट), महांतेश्वर भोसगे (श्यामची आई) आणि सिद्धांत सावंत (आठवणी).

  • सर्वोत्कृष्ट छायादिग्दर्शक ः प्रियांका मयेकर (सुभेदार), विजय मिश्रा (श्यामची आई) आणि वासुदेव राणे (महाराष्ट्र शाहीर)

  • सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक ः अमेय भालेराव (श्यामची आई), प्रतीक रेडीज (सुभेदार) आणि सचिन पाटील (रावरंभा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

FILMFARE 2026
Pune ZP
72nd National Film Award
Shrikant Jadhav and Pooja Khedekar receive MSME Star Award 2026
Marathi News Esakal
www.esakal.com