मी लहान असताना बाबा गेला हे चांगलंच झालं... वडिलांबद्दल असं का म्हणाली सखी गोखले? म्हणते, 'हे ऐकायला क्रूर वाटेल पण...

SAKHI GOKHALE TALKED ABOUT HER FATHER: लोकप्रिय अभिनेत्री सखी गोखले हिने वडिलांबद्दल केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
_ sakhi gokhale
_ sakhi gokhaleesakal
Updated on

'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री सखी गोखले हिने तिच्या सहज, सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. ती लोकप्रिय मराठी अभिनेत्री शुभांगी गोखले आणि दिग्गज दिवंगत अभिनेते मोहन गोखले यांची मुलगी आहे. सखी लहान असतानाच मोहन यांचं निधन झालं. त्यानंतर शुभांगी यांनी सखीला एकटीने वाढवलं. मात्र आता सखीने दिलेल्या मुलाखतीत तिने मोहन यांच्या जाण्याबद्दल भाष्य केलंय. यात ती बाबा मी लहान असतानाच गेला हे चांगलं झालं, असं म्हाणालीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com