
salman khan malaika arora
ESAKAL
'दबंग' या चित्रपट सलमान खानच्या आयुष्यातील एक मैलाचा दगड ठरला. या चित्रपटाने सलमानचं डुबणारं करिअर पुन्हा मार्गावर आणलं होतं. नुकतीच या चित्रपटाला १५ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने 'दबंग' चे दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी मलायका अरोराच्या आयटम सॉन्गबद्दल मोठे खुलासे केले आहेत. अरबाजला त्याची एक्स पत्नी मलाइका अरोराने आयटम नंबर केलेलं चालणार नव्हतं आणि सलमान खानलाही तिच्या कपड्यांवरून अडचण होती. तरीही, मलाइकाने आपल्या मतावर ठाम राहिली आणि हे गाणं प्रचंड हिट झालं.