Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

Salman Khan : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींपैकी अनुज थापन या आरोपीने गळफास घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान या आरोपीचा मृत्यू झाला आहे.
Salman Khan
Salman KhanEsakal

Salman Khan: सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींपैकी अनुज थापन या आरोपीने गळफास घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान या आरोपीचा मृत्यू झाला आहे.

मुंबई पोलिसांनी नुकतीच ही बातमी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली. पोलीस कोठडीत असताना अनुजने गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट निदर्शनास येताच पोलिसांनी त्याला जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आहे.

कोण होता अनुज थापन?

अनुजवर सलमानच्या घरावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना शस्त्रास्त्रं पुरवल्याचा आरोप होता. अनुज हा बत्तीस वर्षाचा होता आणि त्याच्यावर खंडणी, शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते.

काही दिवसांपूर्वी जिवंत काडतुसे आणि दोन पिस्तुले पुरवल्याप्रकरणी सोनू सुभाष चंदर आणि अनुज थापन यांना पोलिसांनी दक्षिण पंजाबमधून अटक केली होती. हे दोघेही बिष्णोई टोळीशी संबंधित असून थापन ट्रकवर मदतनीस म्हणून कामाला होता.

१४ एप्रिल २०२४ला पहाटे सलमानच्या घरावर दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या घटनेनंतर सलमानच्या सुरक्षाव्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत असून काही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या आधी विकी गुप्ता आणि सागर पाल या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. या दोन आरोपींनीच सलमानच्या घरावर गोळीबार केला होता. गुजरातमधील कच्छमधून या आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.

मुख्यमंत्र्यांनी घेतली सलमानची भेट आणि सेलिब्रिटीजमध्ये भीतीचं वातावरण

या घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगेच सलमानची भेट घेतली. या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले होते की, "या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल.हा महाराष्ट्र आहे, ही मुंबई आहे, इथे कुठलीही टोळी नसून पूर्ण ‘अंडरवर्ल्ड’ संपले आहे. आम्ही बिश्नोईला संपवू. पुन्हा कोणीही असा हल्ला करण्याची हिंमत करणार नाही अशी कारवाई करू."

या घटनेनंतर बॉलिवूड सेलिब्रिटीजही घाबरले होते. या घटनेनंतर अनेक सेलिब्रिटीजनी सलमानची आणि त्याच्या कुटुंबाची भेट घेतली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com