बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान लग्न कधी करणार याची चर्चा अजूनही थांबायचं नाव घेत नाहीय. तो लग्न कधी करणार या प्रश्नाचं उत्तर अजूनही अनुत्तरितच आहे. भाईजानला अनेक वेळा लग्नासाठी प्रश्न विचारला गेला होता. परंतु त्याने कधीच त्याचं स्पष्ट उत्तर दिलं नाही. अनेक वर्षापासून तो बॉलिवूडवर अधिराज्य गाजवतोय. वयाच्या 59 व्या वर्षी देखील सलमान खान अविवाहितच आहे. आज देखील चाहत्यांना सलमानने लग्न करावं अशी इच्छा आहे. अशातच आता सलमानची एक पोस्ट चर्चेत आली आहे. ती पोस्ट पाहून सलमान लग्न करणार का? अशी चर्चा रंगताना पहायला मिळतेय.