Viral Video: थकलेला चेहरा, दमलेलं शरीर, सोफ्यावरून उठण्यासाठी आधार घेणाऱ्या सलमानला पाहून नेटकरी गहिवरले, म्हणाले-

Salman Khan Viral Video: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
salman khan
salman khan esakal
Updated on

मुंबईमध्ये नुकतंच एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 'बच्चे बोले मोरिया इवेंट' या कार्यक्रमासाठी अभिनेता सलमान खानदेखील त्याची बहीण अलवीरा खान मल्होत्रासोबत पोहोचला होता. या कार्यक्रमाला सलमानने चार चांद लावले. त्याने स्टेजवर डान्स केला, गाणं गायलं. मुंबई पोलिसांकडून त्याचं स्वागतही करण्यात आलं. मात्र याच कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय जो पाहून चाहत्यांचं हृदय पिळवटून निघालं आहे. चाहते त्याच्या काळजीत पडले आहेत. या व्हिडीओमध्ये सलमानला सोफ्यावरून उठताना त्रास होणारा त्रास दिसतोय त्यामुळे नेटकरी चिंतेत पडले आहेत.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा सिनेसृष्टीतील टॉप अभिनेता आहे. त्याच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. त्याचे चाहते कायमच त्याला भेटण्यासाठी बघण्यासाठी उत्सुक असतात. मात्र आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात अभिनेत्याला पाहून सगळे चकीत झाले आहेत. या व्हिडिओमध्ये सलमान सोफ्यावर बसलेला दिसत आहे. कार्यक्रमात काही वेळाने अभिनेत्री सोनाली बेंद्रे येते. तिला भेटण्यासाठी म्हणून सलमान सोफ्यावरून उठतो. मात्र त्याला उठताना खूप मेहनत करावी लागतेय. तो सोफ्याच्या दोन्ही बाजूचा आधार घेऊन मगच उठतो. त्यानंतर सोनाली त्याच्याकडे येते आणि त्याची गळाभेट घेते.

हा व्हिडिओ पाहून एका यूजरने लिहिले, 'अरे देवा... आमचा आवडता अभिनेता म्हातारा होत आहे.' तर कोणीतरी लिहिलंय, 'ज्येष्ठ अभिनेता म्हातारा होत आहे.' दुसऱ्या यूजरने लिहिले, 'ये यार, तो ५८ वर्षांचा आहे. तरीही तो असाच दिसतो, त्याला सलाम. एका वापरकर्त्याने लिहिले, 'आमचा बालपणीचा आवडता नायक वृद्ध होत आहे आणि आम्हीही. लक्षात ठेवा, काहीही कायमचे टिकत नाही.

एका यूजरने X हँडलवर लिहिले, 'भाईजान खूप थकलेला आणि म्हातारा दिसत आहेत. मला आशा आहे की तो लवकरच परत येईल. आणि शरीर खूप जड वाटत आहे.' एकाने लिहिले, 'या कार्यक्रमात ऐकलं की त्याची तब्येत बरी नाही, तरीही तो कार्यक्रमाला आला.' चाहते आता सलमानच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त करत आहेत.

salman khan
Anupama: 'अनुपमा' मधील अनिरुद्ध म्हणजेच वनराजने चार वर्षांनी घेतला मालिकेचा निरोप; कारण काय? व्हिडिओ शेअर करत म्हणाला-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com