

Samantha Ruth Prabhu and Raj Nidimoru Tied Knot on December 1 in Spiritual Bhuta Shuddhi Vivah
sakal
Samantha Ruth Prabhu’s Bhuta Shuddhi Wedding Explained: समंथा रुथ प्रभू आणि दिग्दर्शक राज निदिमोरू यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होत्या. शेवटी त्या चर्चांना खरं ठरवत, दोघांनी १ डिसेंबर रोजी लग्न करून चाहत्यांना सरप्राईज दिलं. कोयंबतूरमधील सद्गुरूंच्या ईशा योग केंद्रात अगदी साधेपणात, पण आध्यात्मिक वातावरणात हा विवाहसोहळा पार पडला. या खास क्षणी फक्त दोघांचे जवळचे कुटुंबीय आणि काही निवडक मित्रच उपस्थित होते.
लिंगा भैरवी देवीसमोर ‘भूत शुद्धी विवाह’ करण्याचा त्यांचा निर्णय अनेकांसाठी आश्चर्याचा होता. कारण हा विधी नेमका कसा असतो, काय केलं जातं, आणि तो इतका खास का मानला जातो याबद्दल बऱ्याच जणांना माहित नाही.