
बॉलिवूड : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू गेल्या काही दिवसांत तिच्या सिटाडेल: हनी बनी या वेब सिरीजमुळे चर्चेत होती. या सिरीजमध्ये तिच्यासोबत वरुण धवन झळकला होता. मात्र तिची चर्चा होण्यामागे आणखी एक कारण म्हणजे तिच्या आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटाचा विषय. नागा चैतन्यने 2021 साली समंथाला घटस्फोट दिला.