
Marathi Entertainment News : गुलकंद या आगामी सिनेमाच्या निमित्ताने अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता समीर चौघुले पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. नुकताच ‘गुलकंद’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून व्हॅलेंटाईन डेनिमित्त प्रदर्शित झालेल्या या टीझरमध्ये सई आणि समीर यांच्यातील गोड संवाद आणि त्यांचे प्रेमळ नाते पाहायला मिळाले, ज्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सई आणि समीरने त्यांचा एकमेकांबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर केला.