सई ताम्हणकर आणि समीर चौगुले यांचा 'गुलकंद' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. विनोदी भूमिकेसाठी ओळखला जाणारा समीर चौगुलेने पहिल्यांदाच या चित्रपटात डान्स केला आहे.