

SAMEER PARANJPE
ESAKAL
'थोडं तुझं थोडं माझं' या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकणारा लोकप्रिय अभिनेता समीर परांजपे नुकताच नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. त्याची 'सुंदरा मनामध्ये भरली' ही मालिकादेखील गाजली. आता तो झी मराठीवरील 'मोहिनी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात तो नकारात्मक असा दाखवण्यात आलाय. मालिकेत तो खडूस आणि रागीट दाखवण्यात आलाय. आता त्याच्या या नव्या भूमिकेबद्दल त्याची पत्नी आणि आई नेमकं काय म्हणतात हे त्याने सांगितलंय.