

sanai chaughade
esakal
'सनई चौघडे' मालिका सध्या एका रंजक वळणावर आली आहे. जय आणि शर्वरी यांच्या संघर्षात आता एका अशा पात्राची एन्ट्री होत आहे, जिने संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात आपली ओळख निर्माण केली आहे. प्रेक्षकांची लाडकी 'राधिका सुभेदार' म्हणजेच अभिनेत्री अनिता दाते मालिकेत एक महत्वाची भूमिका बजावणार आहे. मालिकेत येताच राधिका सुभेदार जायला एक अट घालणार आहे. त्याच्या ऑफिसमध्ये जोपर्यंत एका स्त्री कर्मचाऱ्याला कामावर ठेवत नाही तोपर्यंत आपण या कंपनीत इन्व्हेस्टमेंट करणार नाही असं ती म्हणते. यामुळे जयची चांगलीच कोंडी होणार आहे.