
मराठी सिनेसृष्टी जगभरात ओळखली जाण्यामागे रंगभूमीचं मोठं योगदान आहे. मराठी नाटक हे सगळीकडे अभिमानाने सादर केला जाणारा विषय आहे. मराठी नाटकांना प्रेक्षक आवर्जून गर्दी करतात. त्यामुळे सध्या मराठी नाटकांचा चांगला काळ सुरू आहे. सिनेमांपेक्षा मराठी नाटक पाहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बऱ्याच नाटकांच्या तिकीट खिडकीवर हाउसफुल चे बोर्ड अगदी काही वेळातच झळकताना पाहायला मिळतायत. प्रेक्षक आपल्या आवडत्या नाटकांचे शो आपल्या शहरात कधी लागतात याची वाट पाहत असतात. मात्र अशाच दोन गाजलेल्या नाटकांचे शो अचानक रद्द करण्यात आलेत.