

sangram samel.jpg
esakal
मराठमोळा अभिनेता संग्राम समेळ याने आपल्या अभिनयाने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी जागा निर्माण केलीये. 'पुढचं पाऊल','मुलगी पसंत आहे', 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकांमध्ये त्याने काम केलं. मात्र त्याची 'जय जय शिव शंकर' या मालिकेमधील शंकर महाराजांची त्याची भूमिका चांगलीच गाजली. मात्र वैयक्तिक आयुष्यात संग्रामने प्रचंड चढउतार पाहिलेत. संग्रामचं अभिनेत्री पल्लवी पाटीलसोबत लग्न झालेलं. मात्र त्याचं हे लग्न फार टिकलं नाही. त्याचं दुसरं लग्न श्रद्धा फाटकसोबत झालं. मात्र आता पहिल्यांदाच संग्राम त्याच्या मोडलेल्या साखरपुड्याबद्दल बोललाय.