

SANJAY DUTT IN JAIL
ESAKAL
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारा लोकप्रिय अभिनेता संजय दत्त याला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. संजय दत्तने 'खलनायक', 'रॉकी', 'साजन' यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांना आपलंसं केलं. मात्र त्याच्या आयुष्यात एक काळ असा होता जेव्हा त्याला काही वर्ष जेलमध्ये राहावं लागलेलं. मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणादरम्यान त्याच्याकडे शस्त्र सापडल्याने त्याला आरोपी मानण्यात आलं होतं. मात्र जेलमध्ये सुरुवातीला संजय नखरे करत होता. तिथलं वातावरण त्याला आवडत नव्हतं. मात्र त्याला एका स्त्रीने वठणीवर आणलेलं.