

sanjay dutt
ESAKAL
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. त्याने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलं. कधी हिरो तर कधी व्हिलन अशा अनेक भूमिका त्याने साकारल्या. मात्र १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर त्याला अटक करण्यात आली. जवळ शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आलेली. त्याला पाच वर्षांची शिक्षा झाली. याप्रकरणी शिक्षा भोगताना त्याला काही वेळेस जामीनही मिळाला, नंतर २०१६ मध्ये त्याची यातून सुटका झाली. संजय दत्तच्या या आयुष्याचा उल्लेख 'संजू' या चित्रपटातही करण्यात आला होता. आता अभिनेत्याने नुकतीच यावर प्रतिक्रिया दिली आहे.