

Director Sanjay Jadhav Opens Up About Duniyadari 2
Esakal
Entertainment News : संजय जाधव दिग्दर्शित दुनियादारी हा सिनेमा खूप गाजला. 2013 साली रिलीज झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर त्यावेळी 32 करोड रुपयांची कमाई केली. त्यावेळी ही कमाई मराठी सिनेविश्वातील सगळ्यात जास्त कमाईपैकी एक होती. त्यानंतर दुनियादारी सिनेमाचा सिक्वेल येणार असल्याची चर्चा सुरु झाली. तशी घोषणाही सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी केली. पण आता या सिनेमाचा सिक्वेल बनवणार नसल्याचं दिग्दर्शक संजय जाधव यांनी स्पष्ट केलं. त्यामागचं खरं कारण त्यांनी उघड केलं.