बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा एक्स पती संजय कपूर याचं 12 जून रोजी निधन झालं होतं. लंडनमध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला होता. अवघ्या 53 व्या वर्षी संजय कपूर याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्याने मधमाशी गिळल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान त्याच्यावर आज (19 जून) रोजी तब्बल सात दिवसांनी अंत्यसंस्कार होणार आहेत.