Sharmin Segal: "ती माझी भाची आहे म्हणून नाही तर..."; 'हिरामंडी'मध्ये शर्मीनला कास्ट करण्यावर अखेर भन्साळींनी सोडलं मौन

Sanjay Leela Bhansali: 'आलमजेब' ही भूमिका साकारणाऱ्या शर्मीन सहगलला मात्र सध्या नेटकरी ट्रोल करत आहे.
'हिरामंडी'मध्ये शर्मीनला कास्ट करण्यावर अखेर भन्साळींनी सोडलं मौन
Heeramandi The Diamond Bazaar sakal

Heeramandi The Diamond Bazaar: काही दिवसांपूर्वी हिरामंडी (Heeramandi The Diamond Bazaar) ही वेब सीरिज नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली. या वेब सीरिजचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी केलं आहे. भन्साळींच्या इतर चित्रपटांप्रमाणे या वेब सीरिजमध्ये देखील मोठ्या सेट्सचा वापर करण्यात. तसेच या वेब सीरिजमधील कलाकारांच्या अभिनयानं देखील अनेकांचे लक्ष वेधले. या वेब सीरिजमधील कलाकरांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. पण या वेब सीरिजमधील 'आलमजेब' ही भूमिका साकारणाऱ्या शर्मीन सहगलला मात्र सध्या नेटकरी ट्रोल करत आहे.

शर्मीनच्या अभिनयाची सध्या नेटकरी खिल्ली उडवत आहे. अशातच आता भन्साळींची भाची असल्यानं शर्मीनला वेब सीरिजमध्ये कास्ट करण्यात आलं, असंही अनेकजण म्हणत. आता शर्मीनच्या कास्टिंगबाबत भन्साळींनी मौन सोडलं आहे.

काय म्हणाले भन्साळी?

इंडिया टुडेशी संवाद साधताना संजय लीला भन्साळी यांनी आलमजेबच्या भूमिकेत शर्मीनला कास्ट करण्याबाबत सांगितलं. ते म्हणाले, "आलमजेबच्या भूमिकेसाठी शर्मीनचा फेस मला परफेक्ट वाटला. तुम्ही आलमजेबची भूमिका पाहिली असेल, तर तिला तवायफ व्हायचे नाहीये. या भूमिकेसाठी मी नव्या नव्या चेहऱ्याच्या शोधात होतो. मी असा चेहऱ्याचा शोध घेत होतो जो निरागस आसेल. जी तवायफसारखी बोलत नाही. जिला कवितेची आवड आहे, अशा आलमजेबच्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर मला आलमजेबच्या भूमिकेसाठी शर्मीन परफेक्ट वाटली."

'हिरामंडी'मध्ये शर्मीनला कास्ट करण्यावर अखेर भन्साळींनी सोडलं मौन
Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

पुढे संजय लीला भन्साळी म्हणाले, "ती माझी भाची आहे म्हणून मी तिला कास्ट केले नाही. तिने बऱ्याच वेळा ऑडिशन दिले. तिनं अनेक टेस्ट देखील दिल्या. तिनं किती टेस्ट दिल्या आहेत, ते मला आठवत नाही. जेव्हा मी शर्मीनला कास्ट करायचे ठरवले होते, तेव्हा मी तिला म्हणालो की, तुला टेस्ट द्याव्या लागतील. मी कास्ट केलेल्या सर्व कलाकारांची कारकीर्द अनेक वर्षांची आहे. भूमिका पडद्यावर कशी आणायची, हे त्या लोकांना माहीत आहे. पण तुला माहीत नाही. हे सर्व तुला शिकावे लागेल, असं मी शर्मीनला म्हणालो होतो."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com