
SANJEEV KUMAR
ESAKAL
'शोले', 'त्रिशूल', 'खिलौना' सारख्या अनेक चित्रपटांमधील दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते संजीव कुमार आजही कित्येकांचे आवडते आहेत. त्यांच्या हटके स्टाईलचे आणि आवाजाचे लाखो लोक चाहते होते. मात्र वयाच्या अवघ्या ४७च्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्या एका सवयीने त्यांचा घात केला असं एका अभिनेत्याने त्याच्या मुलाखतीत सांगितलं आहे. अलीकडेच एका मुलाखतीत, अनुभवी अभिनेते परीक्षित साहनी यांनी संजीव कुमार यांच्या निधनाचं कारण सांगितलंय.