

sanskruti balgude
esakal
कायम सोशल मीडिया वर सक्रिय असणारी संस्कृती बालगुडे तिच्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असताना आता ती अजून एक नवा प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फॅशन कॉन्सेप्ट फोटोशूट आणि अभिनय यांच्या सोबतीने उत्तम भरतनाट्यम नृत्यांगना असलेली संस्कृती लवकरच एका डान्स ड्रामा मधून प्रेक्षकांना मोहित करणार आहे. आजवर संस्कृतीने अनेक मुलाखती मधून तिच आणि श्री कृष्णाच असलेलं नातं या बद्दल भाष्य केलं असून आता संस्कृती एक कमाल नवीन डान्स ड्रामा घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संस्कृती ने सोशल मीडिया वर पोस्ट करून ही खास गिफ्ट तिच्या फॅन्सला दिलं आहे.