‘आईची इच्छा पूर्ण करू शकले नाही’ म्हणत सुवर्ण मंदिरात ढसाढसा रडू लागली सारा अली खान, नेमकं काय घडलं?

WHY DID SARA ALI KHAN CRY AT THE GOLDEN TEMPLE: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता आयुष्मान खुराना यांनी अमृतसरमधील श्री हरमंदिर साहिब म्हणजेच सुवर्ण मंदिरात दर्शन घेतले. यावेळी सारा अली खान आई अमृता सिंह यांची आठवण काढत भावुक झाल्याचे पहायला मिळालं.
VIDEO VIRAL

SARA ALI KHAN CRY VIDEO VIRAL

Esakal

Updated on: 

SARA ALI KHAN EMOTIONAL VIDEO WITH MOTHER AMRITA SINGH: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता आयुष्मान खुराना मंगळवारी श्री हरमंदिर साहिब म्हणजेच सुवर्ण मंदिरात गेले होते. यावेळी सारा अली खान भावुक झाल्याचं पहायला मिळालं. सुवर्ण मंदिरात दर्शन घेताना तिला आई अमृता सिंहची आठवण झाली. आईला सुद्धा या पवित्र स्थळाचं दर्शन घडवण्याची तिची इच्छा होती. परंतु ती इच्छा पूर्ण होऊ शकली नसल्यानं ती मंदिरातच ढसाढसा रडू लागली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com