Marathi Entertainment News : अभिनेत्री खुशबू तावडेने काही दिवसांपूर्वीच एका मुलीला जन्म दिला. पहिला मुलगा राघवनंतर खुशबू दुसऱ्यांदा आई झाली. मुलीच्या जन्मानंतर खुशबूने पहिल्यांदाच लेकीबरोबरच फॅमिली फोटो सोशल मीडियावर शेअर करत लेकीचं नाव जाहीर केलं. .सोशल मीडियावर खुशबूने तिचा फॅमिली फोटो शेअर केला आणि त्यात तिची लेकही दिसतेय. खुशबूने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लेकीचं नाव जाहीर केलं. राधी असं नाव खुशबू आणि संग्रामने त्यांच्या मुलीचं ठेवलं आहे. 'भेटा राधीला - राघवची धाकटी बहीण. ' असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं. खुशबूने फोटो जरी शेअर केला असला तरीही लेकीचा चेहरा इमोजीच्या मदतीने लपवला आहे. त्यामुळे अनेकजण राधीचा चेहरा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. राधी या नावाचा अर्थही तितकाच वेगळा आहे. राधी म्हणजे यश किंवा प्राविण्य असा अर्थ आहे..खुशबूच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांना हा फोटो आवडल्याचं सांगितलं. तर अनेक चाहत्यांनी मुलगी झाल्याबद्दल संग्राम आणि खुशबूचं अभिनंदन केलं. बऱ्याच जणांनी कमेंट करत त्यांना लेकीचं हे युनिक नाव आवडल्याचं म्हटलं. .सलमान आधी 'या' अभिनेत्याला ऑफर झाला होता तेरे नाम ; नकाराने बदललं आयुष्य.दरम्यान खुशबू झी मराठीवरील सारं काही तिच्यासाठी या मालिकेत काम करत होती. पण नंतर तिने प्रेग्नेंसीमुळे ही मालिका सोडली. तिची जागा अभिनेत्री पल्लवी वैद्यने घेतली. खुशबूने मालिका सोडल्यानंतर काही काळातच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. दोन बहिणींच्या नात्यावर या मालिकेची कथा आधारित होती. .तर तिचा नवरा संग्राम सध्या स्टार प्रवाहवरील येडं लागलं प्रेमाचं या मालिकेत काम करतोय. या मालिकेत त्याने इन्स्पेक्टर जय ही निगेटिव्ह भूमिका साकारली आहे. बऱ्याच काळाने संग्रामने स्टार प्रवाहवर कमबॅक केला आहे. या आधी त्याची देवयानी ही मालिका खूप गाजली होती..Smita Patil : ते सुपरहिट गाणं शूट केल्यानंतर स्मिता पाटील धाय मोकलून रडल्या ; काय घडलं नेमकं घ्या जाणून.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.