‘सासूसोबत पत्रिका जुळली तरच लग्न!’ सासू-सुनेच्या नात्यातील गोडवा जपणारी 'कपबशी'ची अनोखी कथा

POOJA SAWANT FAMILY DRAMA MARATHI MOVIE REVIEW ; पूजा सावंत आणि निर्मिती सावंत यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट सासू-सुनेच्या नात्याचा हळवा, भावनिक आणि विनोदी प्रवास उलगडतो. लग्नासाठी होणाऱ्या सासूसोबत पत्रिका जुळण्याची अमृताची आगळीवेगळी अट कथेला वेगळं वळण देते.
CupBashi

CupBashi

esakal

Updated on

NIRMITI SAWANT MOTHER IN LAW DAUGHTER IN LAW STORY: नवरा-बायकोचं नातं महत्त्वाचं असलं तरी संसारामध्ये खरी कसोटी अनेकदा सासू आणि सुनेच्या नात्याचीच असते. सासू आणि सुनेचं नातं हे फारच गुंतागुंतीचं मानलं जातं. कारण सासू म्हणजे कष्टाने, त्यागाने, प्रेमाने आणि मायेने समृद्ध झालेला अनुभव; तर सून म्हणजे नवी उमेद, नवी आशा आणि नव्या स्वप्नांची चाहूल. सासूच्या अनुभवाला सुनेच्या नव्या विचारांची जोड मिळाली की संसाराचा गाडा अधिक सुरळीतपणे पुढे सरकतो. म्हणजेच काय तर सासू आणि सुनेचं नातं हे कपबशीसारखं असतं. दोघींची भूमिका वेगळी असली तरी एकमेकींशिवाय त्या अपूर्ण असतात. कधी आधार देणारी बशी असते, तर कधी ऊब जपणारा कप. नात्यातील हीच परस्परपूरकता घराला घरपण देत असते. नेमक्या याच मुख्य संकल्पनेभोवती फिरणारा चित्रपट म्हणजे ‘कपबशी’.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com