
छोट्या पडद्यावर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेगवेगळ्या वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची घोषणा करण्यात आली आहे. नुकतीच स्टार प्रवाहने 'हळद रुसली, कुंकू हसलं' या मालिकेची घोषणा केली. या मालिकेत अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिनेता अभिषेक रहाळकर यांची नवी जोडी दिसणार आहे. समृद्धी यापूर्वी 'फुलाला सुगंध मातीचा' मध्ये दिसली होती. तर अभिषेकने 'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. आता या मालिकेसाठी स्टार प्रवाहची 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका निरोप घेणार आहे.