
छोटा पडदा म्हणजेच टीव्ही हे माध्यम प्रेक्षकांचं अत्यंत आवडतं. फक्त प्रेक्षकच नाही तर कलाकारांनाही या माध्यमावर झळकण्याचा मोह होतो. त्याचं कारण म्हणजे या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत अगदी लगेच पोहोचता येतं. हे माध्यम कलाकारांना घराघरात नेण्यात मदत करतं. त्यामुळेच टीव्हीवर काम करणं हे अनेक कलाकारांसाठी खूप फायद्याचं ठरतं. त्यामुळे अनेक मोठमोठे कलाकार पुन्हा फिरून टीव्हीवर काम करताना दिसतात. आता अशीच एक मोठ्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री छोट्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झालीये. ही अभिनेत्री तब्बल १० वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.