
SAVITA PRABHUNE
ESAKAL
'पवित्र रिश्ता' ही मालिका टीव्ही इंडस्ट्रीमधील हिट मालिका ठरली. यातील पात्र आणि ते साकारणारे कलाकार दोन्ही प्रेक्षकांच्या कायमचे लक्षात राहिले. या कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली होती. याच मालिकेमुळे सुशांत सिंह राजपूतला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या मालिकेत त्याच्यासोबत अंकिता लोखंडे, प्रार्थना बेहेरे, उषा नाडकर्णी, सविता प्रभुणे, प्रिया मराठे हे मराठी कलाकारदेखील होते. मात्र सुशांतने अचानक या जगाचा निरोप घेतला आणि प्रेक्षकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यावेळेला सगळ्या कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या. मात्र सविता प्रभुणे यांनी त्याच्याबद्दल काहीही न बोलणं पसंत केलेलं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्याचं कारण सांगितलं आहे.