सावित्रीबाई-जोतीरावांच्या विवाहसोहळ्याला आले सावित्रीबाईंचे सहाव्या पिढीतील वंशज उपस्थित; माहेरची ही वस्तू दिली भेट

Savitribai Phule Family Descendants Attained Star Pravah Serial Shooting: स्टार प्रवाहवरील मालिका 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मध्ये सध्या सावित्रीबाई आणि जोतीराव यांच्या विवाह सोहळ्याचा क्षण सुरु आहे. या सोहळ्याला सावित्रीबाईंचे वंशजदेखील उपस्थित होते.
mi savitribai jotirao phule

mi savitribai jotirao phule

esakal

Updated on

स्टार प्रवाहवरील 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका प्रेक्षकांची मनं जिंकतेय. या मालिकेत क्रांतीज्योती सावित्रीबाई आणि क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांनी केलेलं कार्य दाखवण्यात येतंय. ही मालिका टीआरपीमध्येही टॉप १० मध्ये आहे. अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर आणि अभिनेता अमोल कोल्हे हे दोघे मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. लवकरच मालिकेत एक नवं पर्व सुरू होणार आहे. मालिकेत 'सावित्रीबाई आणि जोतीराव यांचा विवाहसोहळा सुरू आहे. गेले कित्येक दिवस या विवाह सोहळ्याची तयारी सुरू होती. अखेर सावित्री आणि जोतीराव यांच्या विवाहाचा आता संपूर्ण महाराष्ट्र साक्षीदार होणार आहे. मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सोहळ्याला सावित्रीबाईंच्या वंशजांनी देखील हजेरी लावलीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com