
छोट्या पडद्यावर सध्या अनेक मालिका प्रेक्षकांचं मन जिंकताना दिसतायत. गेल्या काही वर्षात अनेक मराठी कलाकारांनी स्वतःचं हक्काचं घर घेतलं. कुणी मुंबईत तर कुणी निसर्गाच्या सानिध्यात घर बांधलं. या यादीत आता आणखी एका अभिनेत्रीची एंट्री झाली आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'सावळ्याची जणू सावली'मधील अभिनेत्रीने मुंबई किंवा पुण्यात नाही तर कोकणात हक्काचं स्वप्नातलं घर बांधलंय. तिने घराला नावही खास दिलंय. तिने चाहत्यांसोबत घराच्या गृहप्रवेशाचे फोटो शेअर केले आहेत. आता चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.