

bhagyashree dalavi
esakal
गेल्या काही महिन्यात अनेक मराठी कलाकारांनी आपल्या पार्टनरसोबत लग्नगाठ बांधली. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली दिली. काहींनी अरेंज मॅरेज करत चाहत्यांना धक्का दिला तर काहींनी त्यांच्या बॉयफ्रेंडसोबत सात फेरे घेतले. आता अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिलीये. तिने आपलं प्रेम जाहीरपणे व्यक्त केलंय. कोण आहे ही अभिनेत्री? ही अभिनेत्री आहे झी मराठीवरील 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेतील कलाकार भाग्यश्री दळवी.