Sayaji Shinde forest department
esakal
SAHYADRI DEVARAI FOUNDATION TREE PLANTATION INITIATIVE IN NAGPUR: अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे नेहमीच वृक्ष लागवड करताना पहायला मिळतात. दरम्यान याच वृक्षारोपणाच्या मुद्द्यावरून त्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केलीय. सयाजी शिंदे यांनी 'सह्याद्री देवराई फाऊंडेशन'च्या माध्यमातून हजारो झाडे लावली. आता वृक्षलागवडीचे काम करण्यासाठी त्यांनी पूर्व विदर्भामध्ये देवराई उभारण्याचा उपक्रम घेतलाय. परंतु यासाठी प्रशासन आणि वन विभागाकडून अनेक अटींचा दाखला दिला जात असल्याने काही प्रश्न उपस्थित केले. त्यांनी देवराई विकसित करण्यासाठी वनविभागाकडे मागणी केली. परंतु त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यास वन विभागाने परवानगी नाकारली.