

SAYAJI SHINDE
ESAKAL
नाशिकमध्ये लवकरच कुंभमेळा होणार आहे. मात्र याच कुंभमेळ्यात साधुग्राम बांधण्यासाठी इथल्या तपोवन परिसरातील अनेक वृक्षांची कत्तल केली जातेय. तपोवन येथे हजारो झाडं तोडली जातायत. आता कुंभमेळयासाठी झाडं तोडण्याची प्रक्रिया सुरू झालीये त्यामुळे पर्यावरण प्रेमी चांगलेच संतापलेत. अशातच अभिनेते सयाजी शिंदे यांनी सरकारला धारेवर धरलंय. तुम्ही १ झाड तोडून २०० झाडं कुठं लावताय ते आधी दाखवा असा थेट सवाल त्यांनी सरकारला विचारलाय.