

SAYAJI SHINDE
ESAKAL
'तांबव्याचा विष्णुबाळा', 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा', 'घर बंदूक बिर्याणी' यांसारख्या अनेक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे यांनी फक्त मराठीतच नाही तर हिंदी, कन्नड, तमिळ, तेलगू, सारख्या तब्बल ११ भाषांमध्ये काम केलंय. मराठी सिनेसृष्टीतील अभिनयाचं विद्यापीठ असणारे दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्याशी सयाजी यांचं फार चांगलं नातं होतं. ते त्यांच्यासोबत खूप फिरले होते. निळू फुले यांनी बऱ्याच नकारात्मक भूमिका साकारल्या. त्यामुळे ते खऱ्या आयुष्यातही तसेच होते अशी अनेकांची धारणा झाली. मात्र ते खऱ्या आयुष्यात खूप चांगले होते. त्यांना वाचनाची आवड होती. सयाजी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ते खऱ्या आयुष्यात कसे होते हे सांगितलं आहे.