
छोट्या पडद्यावर सगळ्यात लोकप्रिय ठरलेल्या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ही मालिका म्हणजे 'ठरलं तर मग'. या मालिकेने प्रेक्षकांवर अक्षरशः गारुड घातलंय. गेले २ वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. मालिकांमध्ये अनेकदा अशा काही चुका केल्या जातात. कधी कधी या चुका प्रेक्षकांच्या नजरेतून सुटतात. मात्र कधी कधी या चुका प्रेक्षक नेमक्या पकडतात. अशीच एक 'ठरलं तर मग' मधील चूक प्रेक्षकांनी पकडलीये. मालिकेत एका सीनमध्ये निर्मात्यांनी जुई गडकरीची बॉडी डबल उभी केली आहे. कशी पडकली नेटकऱ्यांनी ही गोष्ट?