आषाढी एकादशीनिमित्त अनेक वारकरी पायी पंढरपूरला निघतात. वारीचा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. अनेक सिनेकलाकार, मराठी कलाकार वारीमध्ये सहभागी होत असतात. अंदाही अनेक सेलिब्रिटींनी वारीमध्ये सहभाग घेतला होता. परंतु अभिनेत्री सायली संजीव वारीमध्ये सहभागी होत वारकऱ्यामध्ये दंग झालीय. सध्या तिचा वारीतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.