अरे मनमोहना रे मोहना! ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना पाहिलंत का? ७७ व्या वर्षीही तोच उत्साह अन् तेज; चाहते भारावले

ASHA KALE LATEST VIDEO AT AGE 77: लोकप्रिय ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आशा काळे यांनी नुकतीच एका लग्नाला हजेरी लावली होती. त्यांना पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
asha kale

asha kale

ESAKAL

Updated on

९० चं दशक गाजवणाऱ्या अशा काही अभिनेत्री आहेत ज्या सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहेत. मात्र त्यांना पाहण्यासाठी किंवा त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अशाच लोकप्रिय नायिकांपैकी एक असणाऱ्या लोकप्रिय मराठी अभिनेत्री म्हणजे आशा काळे. त्यांच्या सौंदर्याने आणि आवाजाने त्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली होती. गेले कित्येक वर्ष चंदेरी दुनियेपासून दूर असणाऱ्या आशा अचानक चाहत्यांसमोर आल्या आणि त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांना पाहून चाहते सुखावले. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आशा यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com