जावेद अख्तर यांच्या पिण्याच्या सवयीला वैतागलेल्या शबाना आझमी; का घेतला दारू सोडण्याचा निर्णय? ३३ वर्षांनी सांगितलं कारण

Shabana Azmi Talked On Javed Akhtar Drinking: शबाना यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पती जावेद यांच्या दारूच्या सवयींबद्दल बोलल्या आहेत.
javed akhtar shabana azmi
javed akhtar shabana azmi sakal

Javed Akhtar Drinking: लोकप्रिय अभिनेत्री शबाना आझमी आणि प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांची प्रेमकहाणी थोडी हटकेच आहे. नुकतीच या जोडप्याने अभिनेता अरबाज खान याच्या 'द इन्व्हिन्सीबल' या शोमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टीवर भाष्य केलं. यात त्यांनी जावेद यांच्या दारू पिण्याच्या सवयीबद्दलही सांगितलं. आपण जावेद यांच्या दारू पिण्याच्या सवयीला खूप वैतागलो होतो असं शबाना यांनी सांगितलं. तर जावेद यांनी आपण दारू का सोडली याबद्दल खुलासा केला. नेमकं ते काय म्हणाले.

शबाना बोलताना म्हणाल्या, 'आम्ही लंडनला एका फ्लॅटमध्ये होतो. त्यांना दारूचा वास येत होता आणि मी म्हणाले की देवा ही ट्रिप किती खराब आहे. मग त्यांनी हळूच मला सांगितलं की जा माझ्यासाठी नाश्ता बनव. त्यांनी नाश्ता केला आणि मग मला म्हणाले की आता मी अजून पिणार नाही. मी काही नाही बोलले. फक्त विचारलं, म्हणजे? त्यावर ते म्हणाले, आता आणखी दारू नाही पिणार आणि तेव्हापासून त्यांनी दारूला हातही लावलेला नाही. त्याची इच्छाशक्ती प्रचंड होती. एकदा ठरवलं आणि करून दाखवलं.'

याबद्दल बोलताना जावेद अख्तर म्हणाले, 'मला याची जाणीव झाली की जर असंच सुरू राहिलं तर मी जास्त दिवस जगू नाही शकणार. माझं काम क्रिएटिव पद्धतीने नाही करू शकणार. ती माझ्यावर यामुळे प्रेम करत नव्हती कारण मी दारू पीत होतो. माझ्या दारू पिण्याच्या सवयीनंतरही ती माझ्यावर प्रेम करत होती. मी जेव्हा दारू पिणं बंद केलं तेव्हा शबाना खूप आनंदी होती. मी म्हटलं हा मूर्खपणा आहे जो मी करतोय. मी दारू पितोय त्यात कोणतंही ग्लॅमर नाहीये, त्याला काहीच इज्जत नाहीये.' जावेद यांनी ३१ जुलै १९९१ रोजी रमची एक मोठी बाटली रिकामी केली आणि १ ऑगस्टपासून दारूला हात लावला नाही.

javed akhtar shabana azmi
Jahnavi Killedar: 'भाग्य दिले तू मला' फेम अभिनेत्रीच्या घरी चोरी; अनेक वस्तू लंपास, धसक्याने आईला अर्धांगवायूचा झटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com