Shah Rukh Khan Health Update: आता कशी आहे शाहरुखची तब्येत? जुही चावलानं दिली हेल्थ अपडेट

Juhi Chawla on Shah Rukh Khan Health: शाहरुखची पत्नी गौरी आणि त्याची मैत्रिण जुही चावला (Juhi Chawla) यांनी रुग्णालयात जाऊन शाहरुखची भेट घेतली. अशातच आता जुहीनं शाहरुखच्या हेल्थबाबत अपडेट दिली आहे.
आता कशी आहे शाहरुखची तब्येत? चुही चावलानं दिली हेल्थ अपडेट
Shah Rukh Khan Health Updatesakal

Shah Rukh Khan Health: अभिनेता शाहरुख खानची (Shah Rukh Khan) प्रकृती कालच अचानक बिघडली होती. उष्माघात झाल्यानं त्याला अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले . त्यानंतर शाहरुखच्या चाहत्यांना त्याच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली. शाहरुखची पत्नी गौरी आणि त्याची मैत्रिण जुही चावला (Juhi Chawla) यांनी रुग्णालयात जाऊन शाहरुखची भेट घेतली. अशातच आता जुहीनं शाहरुखच्या हेल्थबाबत अपडेट दिली आहे.

काय म्हणाली जुही?

शाहरुखच्या तब्येतीबद्दल जुही म्हणाली, "काल रात्री शाहरुखची तब्येत ठिक नव्हती, पण त्याची काळजी घेतली जात आहे आणि आता त्याला बरे वाटत आहे. तो लवकरच बरा होईल आणि जेव्हा आमची टीम अंतिम सामना खेळणार तेव्हा तो वीकेंडला स्टँडमध्ये टीमला सपोर्ट करेल. "

शाहरुखला झाला उन्हाचा त्रास

मंगळवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर IPL 2024 कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (SRH) या सामन्यादरम्यान उष्माघातामुळे शाहरुखला KD रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शाहरुखने त्याची मुलं सुहाना आणि अबराम, तसेच त्याची मॅनेजर पूजा ददलानी यांच्यासोबत मॅचला हजेरी लावली होती.

एएनआयने काल संध्याकाळी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये गौरी खान ही शाहरुखला हॉस्पिटलमध्ये भेटायला जाताना दिसत आहे.

रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त

केडी या रुग्णालयात शाहरुखला दाखल करण्यात आलं. या रुग्णालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शाहरुखच्या चाहत्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी करू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आता कशी आहे शाहरुखची तब्येत? चुही चावलानं दिली हेल्थ अपडेट
Shah Rukh Khan: किंग खानची प्रकृती बिघडली! अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल, उन्हाचा त्रास झाल्याची माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com