
Bollywood Entertainment News : बॉलिवूडमधील एकेकाळचं सुपरहिट कपल म्हणजे शाहिद आणि करीना कपूर. बऱ्याच काळाने पुन्हा ही जोडी एकाच मंचावर एकत्र आली. नुकत्याच आयफा अवॉर्ड्सच्या पत्रकार परिषदेला त्यांनी एकत्र हजेरी लावली. अचानक एकत्र मंचावर भेट झाल्यावर त्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ व्हायरल झालाय.