Shahid Kapoor And Saif Ali Khan: सैफवरील हल्ल्यावर करिनाच्या एक्स बॉयफ्रेंडची प्रतिक्रिया, म्हणाला.. 'खूप वाईट घटना आहे'
Saif Ali Khan Attack: सैफ अली खानची तब्येत आता ठिक आहे. त्याला आता आयसीयूमधून स्पेशल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. दरम्यान शाहिद कपूरने सैफच्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर सगळीकडून प्रतिक्रिया येत होती. सैफ अली खानच्या तब्येतीची विचारपूस सगळीकडून करण्यात आली. अशातच शाहिद कपूरने सुद्धा सैफच्या हल्ल्याबाबत निंदा व्यक्त केली आहे.