SHAKA LAKA BOOM BOOM FAME KINSHUK VAIDYA BECOMES FATHER
esakal
SANJU FROM SHAKA LAKA BOOM BOOM WELCOMES BABY: २००० च्या दशकामध्ये स्टार प्लसवरील 'शाका लाका बूम बूम' ही मालिका लहान मुलांची सगळ्यात आवडती होती. लहान मुलं या मालिकेची आतुरतेने वाट पाहत असायचे. या मालिकेत संजू ही भूमिका मराठी अभिनेता किंशुक वैद्य याने साकारली होती. या मालिकेतून संजूने लहान मुलांना आकर्षित केलं. त्याच्या पेन्सिलची जादू लहान मुलांना खूप आवडायची. दरम्यान आता छोटा संजू मोठा झालाय. इतका की, तो आता एका गोड बाळाचा बाबा झालाय. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिलीय.