SHAKTI KAPOOR FAKE DEATH RUMOUR
esakal
ACTOR SHAKTI KAPOOR SLAMS VIRAL DEATH NEWS: सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियाचा वापर करतो. परंतु सोशल मीडियावर काही खोट्या गोष्टी सुद्धा पसरवल्या जातात. त्यामुळे व्हायरल होत असलेल्या गोष्टीवर शक्यतो विश्वास ठेऊ नये. कलाकरांना तर या गोष्टींचा अनेक वेळा नाहक त्रास सहन करावा लागतो. अनेकजण सोशल मीडियाचा वापर करत कलाकरांबद्दल अफवा पसरवतात. दरम्यान असाच प्रकार अभिनेते शक्ती कपूर यांच्याबाबत सुद्धा घडला आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवल्यामुळे ते अत्यंत अस्वस्थ झाले.