गृहप्रवेशाला 'शिवा' फेम अभिनेत्याने घेतला झक्कास उखाणा; सगळ्यांसमोर बायकोला म्हणाला- 'लग्न मस्त झालंय आता...'

Shalva Kinjvadekar Ukhana On Wedding: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता शाल्व किंजवडेकर याने गृह्प्रवेशाला घेतलेला उखाणा आता व्हायरल होतोय.
shalva kinjvadekar
shalva kinjvadekaresakal
Updated on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'शिवा' प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. या मालिकेतील शिवा आणि आशु यांची जोडी सगळ्यांना आवडतेय. या मालिकेतील आशु म्हणजेच शाल्व किंजवडेकर याने नुकतीच लग्नगाठ बांधली. तो त्याची गर्लफ्रेंड श्रेया डफळापुरकर हिच्यासोबत विवाहबद्ध झाला. त्यांच्या लग्नाचे, हळदीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता त्यांच्या गृहप्रवेशाचा व्हिडिओदेखील चाहत्यांमध्ये व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये ते दोघेही उखाणे घेताना दिसतायत. श्रेयापेक्षा शाल्वचा उखाणा नेटकऱ्यांना जास्त आवडलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com