
priya marathe
esakal
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे हिचं ३१ ऑगस्ट रोजी कर्करोगाने निधन झालं. त्यानंतर तिचा पती आणि अभिनेता शंतनू मोघे एकटा पडला. तिच्या अशा अचानक जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. प्रिया गेली दीड वर्ष कर्करोगाशी झुंज देत होती. तिने पहिल्या वेळी कर्करोगाला हरवलं होतं मात्र दुसऱ्यांदा ती हरली. प्रियाच्या मृत्यूच्या एक दिवस आधी शंतनू 'येड लागलं प्रेमाचं या मालिकेत दिसला होता. तिने रात्रीच त्याचा एपिसोड पाहिला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ती तिचं निधन झालं. गेली दीड वर्ष शंतनू सगळं सोडून तिच्यासोबत होता. तो तिला आधार देत होता. मात्र शेवटी तिचं दुःखद निधन झालं. आता प्रियाच्या निधनानंतर पहिल्यांदाच शंतनूने माध्यमांशी संवाद साधला आहे.