

SHARD PONKSHE
ESAKAL
मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले लोकप्रिय अभिनेते शरद पोंक्षे कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. ते कायमच स्पष्टपणे आपलं मत मांडताना दिसतात. ते त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. अनेकांना त्यांच्या रोखठोक बोलण्यामुळे त्यांना ट्रोलही करण्यात येतं. मात्र तरीही ट्रोलर्सकडे लक्ष ना देता ते आपली मतं मांडताना दिसतात. आता शरद पोंक्षे यांनी 'बाजीराव मस्तानी' या बॉलिवूड सिनेमाबद्दल केलेलं वक्तव्य चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. हा सिनेमा केवळ त्यांच्या प्रेमकथेवर कसा काय आधारित आहे, त्यांचं शौर्य, त्यांचा पराक्रम कुठे गेला, असा प्रश्न त्यांनी विचारलाय.